तू सांग ग सखे,
पुन्हा कशी सुरुवात करू,
तू सांग ग सखे,
पुन्हा कशी सुरुवात करू,
विरली तुझी कहाणी हलकेच ती हवेवर
काही स्पर्श राहिले चिकटून पापण्यांवर
आभाळ गरजले तेंव्हाही वीज चमकली होती
लिहिली कधी कविता मी बेधुंद पावसावर
त्या दुर चांदण्या अन जवळ काजवे सारे
वेड्यापरी धावतो असा मी स्वप्नांच्या आशेवर
ती रात्र जाळणारी वातीसमान मजला
मी दोष लादला होता तेंव्हाही काळोखावर
या जगात मी कुठेही नव्हतो कधी तुझ्याविन
अजूनही मला ते क्षण म्हणतात पाहिल्यावर.
तू सांगत का नाहीस सखे,
पुन्हा कशी सुरुवात करू,
©विजय.व.अहिरे "आबा"