Monday, 10 January 2022

कृपाछत्र


आकाशासारखं अफाट असं 

बापाचं छत्र डोक्यावर असतं, 

आकाशातील असंख्य चांदण्याप्रमाणे

आईचं प्रेम पाठीशी असतं, 

प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी 

मायेचं माणूस जवळ असतं, 

आपल्या मुलांनी काहीतरी 

बनण्याचं त्याचं एक स्वप्न असतं,

आणि म्हणून प्रत्येक मुलाच्या ठिकाणी 

ते साध्य करण्याचं ध्येय असतं,

शेवटी काहीही झाले तरी 

आई-वडिलांच्या ठिकाणीच 

परमेश्वराचं रूप असतं


©विजय अहिरे "आबा"

Saturday, 8 January 2022

असंच जगावं लागतं

असंच जगावं लागतं

झालं गेलं पार पडलं
असं म्हणून जगावं लागतं

अश्रूंच्या धारेत वाहत
समुद्राला भेटावं लागतं

वाळवंटात गेलं की,
तहानेला सहावं लागतं

मनातील दुःखाला लपवून
सर्व काही विसरावं लागतं

डोळ्यातील अश्रूंना पीत
जीवन तर फुलवावं लागतं

दुःखांना सांडत
असंच जगावं लागतं

मोरपंखी जीवन सरले की,
मृत्यूशय्येवर निजावं लागतं

©प्रा. विजय अहिरे "आबा"

कसं उत्तर देऊ तुला… भावनांचा डोंगर घेऊन चालत आहे

कसं उत्तर देऊ तुला… भावनांचा डोंगर घेऊन चालत आहे कसं उत्तर देऊ तुला, जेव्हा शब्द अपुरे पडतात आणि भावना मात्र डोंगरासारख्या छातीव...