Saturday, 8 January 2022

असंच जगावं लागतं

असंच जगावं लागतं

झालं गेलं पार पडलं
असं म्हणून जगावं लागतं

अश्रूंच्या धारेत वाहत
समुद्राला भेटावं लागतं

वाळवंटात गेलं की,
तहानेला सहावं लागतं

मनातील दुःखाला लपवून
सर्व काही विसरावं लागतं

डोळ्यातील अश्रूंना पीत
जीवन तर फुलवावं लागतं

दुःखांना सांडत
असंच जगावं लागतं

मोरपंखी जीवन सरले की,
मृत्यूशय्येवर निजावं लागतं

©प्रा. विजय अहिरे "आबा"

No comments:

Post a Comment

कसं उत्तर देऊ तुला… भावनांचा डोंगर घेऊन चालत आहे

कसं उत्तर देऊ तुला… भावनांचा डोंगर घेऊन चालत आहे कसं उत्तर देऊ तुला, जेव्हा शब्द अपुरे पडतात आणि भावना मात्र डोंगरासारख्या छातीव...