Monday, 18 October 2021

वह कौन थी?

🌺☘️🌺☘️🌺☘️🌺☘️
वह कौन थी?,
जी हृदयात घर
करून गेली..
जो कभी खुला नहीं था,
दार ते उघडून गेली…
🌺☘️🌺☘️🌺☘️🌺☘️

अगदी दूर राहूनही अंतर

आम्ही म्हणत नाही
हमें अपनी जिंदगी का
एक भाग समजून ठेवा ..

अगदी दूर राहूनही अंतर
ना लगे इतना सा रिश्ता
तर प्रेम असच सुरू ठेवा ... ♥

Friday, 15 October 2021

आज सोनियेचा दिवस पहात......


आली सोनियेची पहाट,
नवे विचार नवी आकांक्षा,
नव्या प्रकाशित पर्वाचा,
होत असतो नव्या चैतन्याचा आभास,
टिपून या क्षणांचा मिलाप,
आज सोनियेचा दिवस पहात......

आभासुनी या क्षणांना,
निर्मळ निश्चळ क्षितिजावर,
आनंद घेऊनि प्रभात,
भेदूनी मनाच्या क्षीण विचारांचा,
उमेद जागवू नव्या विचारांचा,
टिपून या क्षणांचा मिलाप,
आज सोनियेचा दिवस पाहत.......


Wednesday, 13 October 2021

सुर्यतेज

🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴
सूर्य हा तेजासम
नेहमी असा तेवत राहावा
हा निसर्ग अमुचा असाच असावा
ह्या सुंदर विश्वाची जणु
आयुष्य नेहमी उजळत राहावा
अंधारमय प्रकाशात
आनंदाचे सुंदर असा किरणांने
आयुष्य नेहमी उजळत राहावा
🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴

रम्य आठवणी

  
     
        पाकळ्या पाकळ्यामधूनी            
             जणू उमलत जाते
             आठवणीचा ठसा
         प्रश्न  पडे मजला एवढा काळ 
             लोटला कधी अन् कसा
   
            कधी आठवते ती
                संध्याकाळ
          मित्रांसोबत केलेली
           थट्टा अन् अनुभवलेला 
            मैत्रीचा कट्टा

         कधी आठवणीत  येतात 
         हसवा अन् रडवा क्षण
             कधी आठवते ते
         घाबरलेले मन 

         कधी आठवते ती झालेली
                      चूक
            आठवणीत येते ...उत्तर
              येत असताना 
            राहिलेली मी मूक

      सुखद दुःखद क्षण हे सारे
             मनात वसले
        आठवणीत शिरताच मी 
         सारे क्षण पुन्हा  एकदा 
                  जगलो

Tuesday, 12 October 2021

'कालरात्री'

वामपादोल्लसल्लोहलताकंटकभूषणा।🙏💐

वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भययंकारी।।

🌷दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे.

     नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या साक्षात्कारापासून मिळणार्‍या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते.

या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत.

कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कट्यार) आहे.

कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त  पूजा केली पाहिजे.👏💐


Sunday, 10 October 2021

सहसंबंध जीवनाचा आनंद घेऊनि,

🌴🍁🌴🍁🌴🍁🌴🍁🌴🍁🌴🍁🌴🍁

सहसंबंध जीवनाचा आनंद घेऊनि,
मी तसा नाविक तरबेज आहे,
समाजरूपी विचारांचा वाईट वृत्ती भेद आहे,
कसला उमाज ह्या वैचारिकांचा,
सत्य हे अफवांच्या पुरात शोधत आहे...

🌴🍁🌴🍁🌴🍁🌴🍁🌴🍁🌴🍁🌴🍁


🌴विजय अहिरे ꧁༒आबा༒꧂🍁


Friday, 8 October 2021

जग सारा दुमदुमडला

आज सूर्य उगवला,
नव्या चैतन्याचा प्रकाश उजाडला,
हिरवीगार सोनेरी पालवांनी,
जग सारा दुमदुमडला,

नव्या उमेद नव्या आशा,
मनी नव्या चैतन्याच्या लहरी,
नव्या विचारांचा प्रसार सारा,
जग सारा दुमदुमडला

आशा निराशा विनाश करुनी,
नव चैतन्याचा उभार आला,
भक्तीचा नाद उमटला,
जग सारा दुमदुमडला

Thursday, 7 October 2021

आज ही मेरे ह्रदय ने.

आज ही मेरे ह्रदय ने.
मला सांगितले
मेरा भी ख्याल रखो....
इतरांकडून
मला दुखवू नका
योगा जॉगिंगचा व्यायाम करा
बाहर का भोजन खाना ना
फक्त अन फक्त तणाव मुक्त राहा
जीवन भर जो हृदय का ख्याल रखें
अशा प्रिय व्यक्तीला हृदयात बसवा

सूर्य आणि पाऊस

आज सकाळी आकाशात सूर्यही चमकला,
पाऊसही बरसला,
मुद्रांध सगळीकडे दरवळतोय,
आणि माझे पाय मात्र बरबटलेत...चिखलाने!
माझं घर तिकडं दूर मेघमालांच्या पलीकडं आहे....
दूर ,पण माझ्यासारख्या परक्या पाहुण्यानं इथं,
अशाही स्थितीत आनंद राहायला हवं.... आनंदी आनंद

पावसानंतर...

पावसानंतर जंगल कसं हिरवीगार, टवटवीत झालंय,
पाईनच्या रांगामधून चंद्र मला खुनावतोय,
माझ्या ह्रुदयाला साद घालतोय,
नाही म्हटलं तरी मलाही मंद हसू फुटतय,
पण, माझ्या मनात घरचा विचार येतोय,
कारण, मी इथे परक्या भूमीवरील,
परक्या पाहुण्यासारखा आहे........

कसं उत्तर देऊ तुला… भावनांचा डोंगर घेऊन चालत आहे

कसं उत्तर देऊ तुला… भावनांचा डोंगर घेऊन चालत आहे कसं उत्तर देऊ तुला, जेव्हा शब्द अपुरे पडतात आणि भावना मात्र डोंगरासारख्या छातीव...